[mumbai] - काँग्रेस सावरकरविरोधी नाही: मनमोहन सिंग

  |   Mumbainews

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने यांना भारतरत्न मिळावा म्हणून प्रयत्न करणार, असे आश्वासन दिल्याने राजकारण तापलं असतानाच माजी पंतप्रधान व काँग्रेस नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी काँग्रेस सरकारविरोधी नसल्याचे स्पष्ट करत भारतरत्न कुणाला द्यायचा हा निर्णय एका समितीमार्फत घेतला जातो, याकडे लक्ष वेधले.

भाजपने राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या संकल्पपत्रात थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह वीर सावरकरांना भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन दिले आहे. यातील सावरकरांच्या नावावर काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. सावरकरांना जर भारतरत्न मिळणार असेल तर मग नथुराम गोडसेलाही भारतरत्न मिळेल?, असे वक्तव्य या दोन्ही नेत्यांनी केले आहे. गांधी हत्या प्रकरणात वीर सावरकर यांच्यावरही खटला चालला होता, असे नमूद करताना तिवारी यांनी कपूर आयोगाचा हवाला दिला व सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीस विरोध केला आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाला विशेष महत्त्व आहे....

फोटो - http://v.duta.us/9BV9LQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/XAecOQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬