[mumbai] - 'कोणताच समाजघटक सुखी नाही!'

  |   Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

देशाची औद्योगिक राजधानी असलेल्या मुंबईत एकेकाळी १०० पेक्षा जादा कापड गिरण्या होत्या. त्यातील लाखो कामगारांना देशोधडीला लावून तेथे टॉवर्स संस्कृती उभारण्यात आली. जेट विमान कंपनी बंद पडल्यामुळे २५ हजार लोक बेकार झाले. मुंबईसह राज्यातील ५० टक्के कारखाने यांच्या राजवटीत बंद पडल्यामुळे लक्षावधी बेकार झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. भाजपच्या राज्यात कोणताच समाजघटक सुखी नसल्यामुळे, राज्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या संयुक्त आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत केले.

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवाब मलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना पवार यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणावर सडकून टीका केली. मुंबई शहर देशाची औद्योगिक राजधानी होती. मुंबई, ठाणे, पुणे, रांजणगाव यासह राज्यात बहुतांश भागातील उद्योगधंदे बंद पडत आहे. मात्र त्यावर उपाययोजना करण्यात सरकारला अपयश आले आहे. केंद्र सरकारने जेट कंपनी ताब्यात घेऊन त्या कामगारांना दिलासा देण्याची गरज होती. लाख दोन लाख रुपयांच्या कर्जाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरांवर जप्ती आणली जाते. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. पण बड्या धनदांडग्या मंडळींचे ८० हजार कोटी रुपयांचे कर्ज सरकारने बँकांत भरले आहे. शेतकऱ्यांना एक न्याय आणि धनदांडग्यांना वेगळा न्याय सरकार देत असल्याचा आरोप करून या भाजपच्या सत्ताधाऱ्यांना गरीब, श्रमिक व शेतकऱ्यांची चिंता नाही. त्यामुळेच आपण या निवडणुकीत अधिक लक्ष केंद्रित केले आहे, असे पवार म्हणाले....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/mT7qQAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬