[mumbai] - देशातील अनेक बँका बुडण्याची भीतीः राज

  |   Mumbainews

मुंबईः माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी भारताची अर्थव्यवस्था उंचीवर नेऊन ठेवली होती. परंतु, केंद्रात सत्ताबदल झाल्यापासून देशातील अर्थव्यवस्थेची वाईट स्थिती झाली आहे. देशावर मंदीचे सावट असून देशातल्या अनेक बँका अजून बुडण्याची शक्यता आहे, उद्योगधंदे बंद पडण्याची आणि महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या नोकऱ्या जातील, अशी भीती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची आज मुंबईतील प्रभादेवी येथे सभा पार पडली. विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून भाजपवर शरसंधान साधणाऱ्या राज ठाकरे यांनी आजच्या सभेतही भाजपवर सडकून टीका केली. देशावर सध्या मंदीचे सावट आहे. यावर सरकार काय करेतय मला माहिती नाही. सरकारने जे निर्णय घेतले त्यावरून हे सावट अधिक गडद होईल, असे दिसतेय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांच्या नोटा छापणे बंद केल्याची बातमी आहे. ही बातमी खरी असेल किंवा या नोटा बंद झाल्यास पुन्हा एकदा लोकांना त्रास सहन करावा लागेल. पुन्हा एकदा रांगेत उभे राहावे लागेल. अनेक लोक मृत्यूला कवटाळतील. पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक बंद पडल्याने ३ खातेदारांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला तर एका महिलेने आत्महत्या केली. गेल्या पाच वर्षात राज्यात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, इतके झाल्यानंतरही याचे सरकारला काहीच सोयरसुतक नाही, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले....

फोटो - http://v.duta.us/EPcMbwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/GiqASQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬