[mumbai] - निवडणुकीत रंगली पोलीस दलातील शत्रुत्वाची चर्चा

  |   Mumbainews

मुंबई: काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत पोलीस दलातील जुन्या वितुष्टांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळसकर यांची कन्या दिव्या यांनी नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आणि बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा हे नालासोपाऱ्यातून निवडणूक लढवत आहेत. एकेकाळी शहीद साळसकर आणि शर्मा यांचे संबंध चांगले नसल्याचे सर्वश्रुत होते. साळसकरांच्या कन्या दिव्या यांनी क्षितीज ठाकूर यांना पाठिंबा देत अप्रत्यक्षपणे शर्मा यांना विरोध दर्शवला असल्याचे बोलले जात आहे.

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळसकर शहीद झाले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने साळसकर आणि शर्मा यांच्यातील संबंधांबाबत साळसकर कन्या दिव्या यांनी ठाकूर यांना पाठिंबा दर्शवत पोलीस दल आणि राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला वाट मोकळी करून दिली आहे....

फोटो - http://v.duta.us/yMR1KAAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/6LNZaAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬