[mumbai] - 'पीएमसी' विरोधात लढा उभारणार

  |   Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेत अंदाजे अकराशे पतसंस्थांचे तब्बल ८०० कोटी रुपये अडकल्याने त्यावर रणनीती ठरवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने बुधवारी मुलुंडमध्ये बँकेत ठेवी अडकलेल्या पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी रिझर्व्ह बँकेविरोधातही प्रतिक्रिया उमटल्या व पीएमसी बँकेविरोधात लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

पीएमसी बँकेतील ठेवीदारांसाठी लवकरच एकत्र येऊन बँकेच्या खातेदार, पतसंस्था आणि ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित व्हाव्यात यासाठी मोठा लढा उभा करू, असा निर्धार यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने केला. बँक रेग्युलेटरी अॅक्टनुसार 'आरबीआय'कडून दरवर्षी बँकेचे अहवाल तयार केले जातात. मग हा अहवाल सामान्यांपर्यंत का पोहोचत नाही, बँकेची दयनीय अवस्था वेळीच लक्षात आली असती तर, खातेधारकांना वेळीच योग्य निर्णय घेणे शक्य झाले असते, अशी तक्रार यावेळी फेडरेशनच्या वसंत शिंदे यांनी मांडली. 'आरबीआय'ने पीएमसी बँकेला अ श्रेणीत वर्गीकृत केल्यांनतर आम्ही विश्वासाने गुंतवणूक केली. मात्र आता 'आरबीआय'नेच आर्थिक निर्बंध घातल्यानंतर सामान्यांनी कोणाकडे न्याय मागायचा, असा सवाल फेडरेशनकडून उपस्थित करण्यात आला....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/qR5soQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬