[mumbai] - बंडखोरीला अप्रत्यक्ष प्रोत्साहन

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्यात युती जाहीर झाली असल्याने युतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. मात्र ही कारवाई करताना देखील ज्या ठिकाणी पक्षाचा बंडखोर उमेदवार निवडून येण्याची वा समोरच्या मित्रपक्षाच्या उमेदवारला हमखास पाडण्याची चिन्हे आहेत, अशा ठिकाणी मात्र शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सोयीस्करपणे युतीच्या धर्माला धाब्यावर बसवले आहे. निवडणुकांना पाच दिवस उरले असतानाही संबंधित बंडखोरांना पक्षाने धक्का लावला नसून त्यांना पक्षाकडूनच छुपे प्रोत्साहन दिले जात असल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून समजते.

ऐनवेळी शिवसेना भाजप यांच्यात युती झाल्याने दोन्ही पक्षांत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी पहायला मिळते. काही ठिकाणच्या बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आली असली तरी इतर अनेक ठिकाणी मात्र बंडखोरांवर कारवाई झालेली नाही. संबंधित उमेदवार एकतर निवडून येण्याची वा मित्रपक्षाच्याच उमेदवाराला पाडण्याची शक्यता असल्यानेच त्यांच्याबाबत अद्याप दोन्ही पक्षांनी सोयीस्कर निर्णय घेतला नसल्याचे कळते. युतीच्या जागावाटपात कल्याण पश्चिम ही जागा शिवसेनेकडे आली असून याठिकाणी शिवसेनेने विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या ठिकाणी भाजपचे विद्यमान नरेंद्र पवार यांचे तिकिट कापल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे. नरेंद्र पवार विद्यमान आमदार असल्याने त्यांची नाराजी शिवसेनेला महागात पडू शकते. कल्याण पूर्वमध्ये गणपत गायकवाड यांना भाजपने उमेदवार दिली असून त्यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बोडारे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसेनेच्या २६ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे त्यांची बंडखोरी भाजपला अडचणीची ठरणार आहे....

फोटो - http://v.duta.us/uIh9ugAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/2XMAggAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬