[mumbai] - मुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन

  |   Mumbainews

मुंबई: मुंबईची 'भेळ क्वीन' अशी ओळख असलेल्या नीला मेहता यांचे नुकतेच निधन झाले. ४५ वर्षांपासून घरगुती गुजराती पदार्थ विक्रीचा व्यवसाय त्या करत होत्या. अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली आणि जकार्तामध्येही त्यांच्या पदार्थांना मागणी होती. नीला मेहता यांच्या निधनानंतर आता त्यांचे कुटुंब हा व्यवसाय सांभाळणार आहेत.

नीला मेहता यांना मुंबईची 'भेळ क्वीन' या नावानं ओळखलं जायचं. पेडर रोड येथे त्यांचं मोठं स्टोअर होतं. ४५ वर्षांपासून घरगुती ढोकला, खांडवी, भेळपुरी, शेवपुरी, समोसा आणि गुजराती स्नॅक्स विक्रीचा व्यवसाय त्या करत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, नीला मेहता यांनी साधारण १९७४ साली घरगुती पदार्थ विक्रीचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी सुरुवातीला ढोकळा विकण्यास सुरुवात केली. त्यावेळी दारोदारी ढोकळा विकला जायचा. आजघडीला त्यांचे शहरात ठिकठिकाणी दुकानं आहेत. केंप्स कॉर्नर, कफ परेड आणि पेडर रोडला त्यांचे स्टोअर्स आहेत. दरम्यान, त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या जुन्या ग्राहकांनीही त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला....

फोटो - http://v.duta.us/Wv1qIAAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/LxplswAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬