[mumbai] - वृक्षतोडीला मनाई कायम

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: कासारवडवली-घाटकोपर-वडाळा या मार्गावरील मेट्रो-४ प्रकल्पाबरोबरच ठाण्यातील विविध विकास प्रकल्पांसाठी तीन हजार ८८० झाडे तोडण्याच्या निर्णयावरील मनाई आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आता ३ डिसेंबरपर्यंत कायम ठेवला आहे.

ठाणे वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी अॅड. अंकित कुलकर्णी यांच्यामार्फत केलेली जनहित याचिका बुधवारी मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आली असता, ठाणे महापालिकेने प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्यासाठी आणखी मुदत मागितली. त्यामुळे खंडपीठाने पालिकेला मुदत देतानाच पालिकेच्या उत्तरावर याचिकादारांनीही आपले उत्तर प्रतिज्ञापत्रावर दाखल करावे, असे निर्देश देऊन पुढील सुनावणी ३ डिसेंबरला ठेवली. तसेच तोपर्यंत झाडे तोडण्याचा आधीचा मनाई आदेश कायम राहील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले....

फोटो - http://v.duta.us/EfHzvAAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/HEy7LQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬