[mumbai] - स्टेन्टसाठी मनमानी शुल्क

  |   Mumbainews

जेजे रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघड

@KSharmilaMT

मुंबई : हृदयविकारावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेन्टच्या किंमती निर्धारित केल्या असतानाही, जेजे रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागाकडून या स्टेन्टसाठी मनमानी पद्धतीने दरआकारणी करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेमधील गोरगरीब रुग्णांनाही खासगी कंपन्याकडून विकत घ्याव्या लागलेल्या अतिरिक्त स्टेन्टमुळे नाहक भुर्दंड पडत आहे. कार्डिओलॉजी विभागाला वारंवार सूचना देऊनही स्टेन्ट विक्री करणाऱ्या कंपन्यांचे दलाल व जेजे रुग्णालय परिसरातील औषधविक्रेत्यांचे साटेलोटे सुरूच असून लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी काही रुग्णांनी केल्या आहेत.

म. फुले आरोग्यदायी योजनेतील दरानुसार, हृदयविकार दूर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेन्टची किंमत २३ हजार ६२५ इतकी निर्धारित करण्यात आली आहे. स्टेन्टसह संपूर्ण शस्त्रक्रियेचा खर्च ८० हजार रुपये इतका संमत करण्यात आलेला आहे. दोनपेक्षा अधिक स्टेन्टची गरज भासली, तर अंतर्गत समितीच्या संमतीनंतर त्याच दराने तिसरा व चौथा स्टेन्ट देण्यात येतो. मात्र मागील दोन वर्षांपासून दोनपेक्षा अधिक स्टेन्ट लागत असलेल्या अनेक रुग्णांकडून तिसऱ्या व चौथ्या स्टेन्टसाठी अतिरिक्त पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी आहेत. आरोग्यदायी योजनेमधील व त्याबाहेरील रुग्णांनाही हा अनुभव आला आहे. स्टेन्टसाठी ३० ते ५० हजार रुपयांपर्यंत दरआकारणी करून ठराविक कंपनीच्याच दलालांना हे कंत्राट देण्यात येत असल्याचेही या तक्रारींमध्ये म्हटले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/vfFmwgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬