[mumbai] - सलाम! ट्रेनमधून पडलेल्या इडलीविक्रेत्याला मोटरमननं वाचवलं

  |   Mumbainews

मुंबई: ट्रेनमधून पडल्यानंतर बेशुद्धावस्थेत रेल्वे रुळांवर पडलेल्या प्रवासी तरुणाला मोटरमननं वाचवलं. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. चुलबूल कुमार (वय १९) असं या प्रवाशाचं नाव आहे. तो मानखुर्दमध्ये राहणारा असून, इडली विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो. प्रसंगावधान राखून इडली विक्रेत्या तरुणाचा जीव वाचवणाऱ्या मोटरमनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

चुलबूल कुमार हा मानखुर्दमध्ये राहतो. त्याचा इडली विक्रीचा व्यवसाय आहे. मंगळवारी संध्याकाळी तो ट्रेनच्या मालडब्यातून प्रवास करत होता. त्यानं पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, 'तो ट्रेनमधील मालडब्यातून प्रवास करत होता. तो दरवाजात उभा होता आणि त्याच्या पायांजवळ इडलीचं भांडं होतं. अचानक त्याचा हात सुटला आणि ट्रेनमधून खाली पडला.' साधारण संध्याकाळी सहा वाजता रेल्वे रुळांवर जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणाकडे पनवेल-सीएसएमटी ट्रेनचे मोटरमन गुमानी दास यांचं लक्ष गेलं. त्याच्या आजूबाजूला भांडी पडलेली होती. त्यांनी लगेच ट्रेन थांबवली, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली....

फोटो - http://v.duta.us/NXM0CwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/WoIYjwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬