[nagpur] - खड्ड्यांची करा ऑनलाइन तक्रार

  |   Nagpurnews

म.टा. विशेष प्रतिनिधी,नागपूर

शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. मात्र या खड्ड्यांबाबत अचूक आणि योग्य माहिती मिळाल्यास ते तत्काळ बुजविता येऊ शकतात. यासाठी मनपाच्या ई-मेल, फेसबुक व ट्विटरवर पेजवर तक्रार नोंदवून मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.

मनपाला प्राप्त झालेल्या तक्रारी आणि सर्वेक्षणाद्वारे निदर्शनास आलेले खड्डे बुजविण्यात आले. मात्र शहरातील अनेक भागात अजूनही खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहे. अशा खड्ड्यांची माहिती मिळाल्यास मनपातर्फे त्वरीत बुजविण्याचे काम करण्यात येईल. यासाठी आता ई-मेलसह फेसबुक आणि ट्विटरवर तक्रार करता येणार आहे. शहरातील खड्ड्यांसंदर्भात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची समन्वय समितीही गठीत करण्यात आली आहे. समितीतर्फे शहरात खड्डे दुरूस्त करण्यात येत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरूस्तीबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. रस्ता वापरण्यायोग्य नसल्यास व रस्त्यावर अपघात झाल्यास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. कंत्राटदारावर गुन्हा न नोंदविल्यास संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून गुन्हा नोंदविला जाणार आहे. त्यामुळे खड्ड्यांसंदर्भात गांभीर्याने आणि जबाबदारीने काम करण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/EYVLkAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬