[nagpur] - डेंग्यूचा विळखा कायम

  |   Nagpurnews

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

संपूर्ण राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा ज्वर चढला आहे. मात्र शहरातील वस्त्यांचा कानोसा घेतला असता संपूर्ण उपराजधानीत डेंग्यूसदृष्य आजारानेही थैमान घातल्याचे स्पष्ट होत आहे. जानेवारी ते सप्टेंबर या आठ महिन्यात २०१८ मध्ये एकट्या नागपूरात १८५ डेंग्यूग्रस्त आढळले. परंतु यंदा या काळात गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूचे रुग्ण १३ टक्यांनी वाढले आहेत. त्यामुळे हा आकडा आता २०९ वर पोहचले आहे. दुसरीकडे विभागात आतापर्यंत जवळजवळ पाचशे जणांना डेंग्यूच्या डासांनी डंख मारला आहे. त्यात पैकी सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर आणि त्या खालोखाल नागपुरात आढळले आहेत.

संपूर्ण विभागात डेंग्यूचा विळखा घट्ट होत असल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. या आजाराने आतापर्यंत विभागात तीघांचा बळी घेतला आहे. त्यात भंडारा गोंदिया आणि नागपूर शहरातील एकाचा समावेश आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/6iP28AAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬