[nagpur] - पायऱ्यांवरूनही चढेल व्हिलचेअर

  |   Nagpurnews

म.टा. प्रतिनिधी नागपूर

नागपूर शहरातील विधानसभा मतदारसंघातील २२ मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी पुरेशा सुविधा नसल्याचे पुढे आले आहे. अनेक ठिकाणी रॅम्प नसल्याने दिव्यांगांनी चढावे कसे हा प्रश्न होता. यावर तोडगा काढण्यासाठी निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने पायऱ्यांवर चढणाऱ्या व्हिलचेअरची व्यवस्था केली असल्याचे दिव्यांग विभागाचे नोडल अधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.

चार फिरत्या रुग्णवाहिका यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांमध्ये या खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. शहरातील २२ मतदान केंद्रांवर जाताना दिव्यागांना अनेक अडचणी येऊ शकतात. कुठे रॅम्प नाही. तर कुठे रॅम्प आहे, मात्र प्रत्यक्ष मतदान असलेल्या कक्षात जाण्यासाठी पुन्हा पायऱ्या आहेत. या मतदान केंद्रांवर या पायऱ्यांवर चढणाऱ्या खुर्च्या ठेवण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

सुविधा नसलेले केंद्र...

फोटो - http://v.duta.us/FNMAugAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/SdDa0QAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬