[nagpur] - पूर्वमध्ये स्ट्रेट फाइट

  |   Nagpurnews

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत यंदा भाजपचे कृष्णा खोपडे आणि काँग्रेसचे नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांच्यात सरळ लढत होणार आहे. इतर उमेदवार लढतीत बरेच मागे पडल्याचे दिसून येत आहे.

महापालिका निवडणूक असो की लोकसभा निवडणूक, पूर्व नागपूर भाजपला साथ देत असते. भाजपचे सर्वाधिक नगरसेवक याच भागातून येतात. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले आधिक्य बघता आणि काँग्रेसचे दावेदार अभिजित वंजारी यांनी माघार घेतल्यानंतर इथे एकतर्फी लढत होईल, असे बोलले जात होते. काँग्रेस कार्यकर्ते बऱ्या पैकी कामाला लागल्याने या भागात लढत होईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

पूर्व नागपुरातील भाजपचे संघटनात्मक जाळे, खोपडे यांचा मितभाषी स्वभाव, लोकांशी असलेला संपर्क, प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होण्याची पध्दत त्यांचे बलस्थान आहेत. याभागात अनुसुचित जाती आणि मुस्लिम मतांची संख्या फारशी नसणे हे सुध्दा त्यांच्या पथ्यावर पडत असते. यावेळी स्मार्टसिटीमुळे झालेले आंदोलन, भांडेवाडी डम्पींग यार्डचा प्रश्न त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/GrF2_QAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬