[nashik] - उद्धव ठाकरेंची उंची मोदींएवढी नाही

  |   Nashiknews

किरीट सोमय्या यांचा शिवसेनेला टोला

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जळगाव येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोटो न लावण्यावरून भाजपचे माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. नरेंद्र मोंदीची उंची मोठी आहे, त्यांचा प्रोटोकॉल ठरलेला असतो. त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी तुलना होऊ शकत नाही, असा टोला शिवसेनेला लगावला. लोकसभा निवडणुकीत मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच महायुतीला मते मिळाल्याचे सांगत शिवसेनेला सोमय्या यांनी डिवचले आहे.

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सोमय्या बुधवारी (दि. १६) नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना सोमय्या यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्ष शिवसेनेवरही अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला. राज्यात महायुतीच पुन्हा सत्तेवर येणार असून, २३३ जागांवर विजय मिळेल असा दावाही त्यांनी केला. जळगावमधील मोदींच्या सभेत उद्धव ठाकरेंचा फोटा लावला नसल्याने राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलेल्या नाराजीबाबत विचारले असता, पंतप्रधानांच्या सभेचा एक प्रोटोकॉल ठरलेला असतो, त्याप्रमाणे सभेचे नियोजन केले जाते. मोदी यांची उंची ठाकरे यांच्यापेक्षा अधिक आहे, असा टोला लगावला....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/DOmbOwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬