[nashik] - कौशल्य संपादनासह विकासाला

  |   Nashiknews

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक केंद्र सरकारच्या संकल्प प्रकल्पातील अरुणकुमार पिलई, विक्रांत चावला, आशु मलिक व त्यांच्या सहकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी 'निमा'च्या सातपूर येथील कार्यालयास भेट दिली. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राष्ट्रीय कौशल्य विकास अभियानांतर्गत उपजीविकेसाठी कौशल्य संपादन व ज्ञान जागरुकता अभियान राबविण्यासाठी केंद्र सरकारने नाशिक जिल्ह्याची निवड केली आहे. त्यासाठी ही भेट या शिष्टमंडळाने घेतली. संकल्प प्रकल्पात संस्थात्मक यंत्रणा मजबूत करणे, दर्जेदार प्रशिक्षकांचा समूह तयार करणे, सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांचा समन्वय करणे, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचे सनियंत्रण व मूल्यमापन करण्यासाठी प्रभावी यंत्रणा निर्माण करणे अशी कामे केली जाणार आहेत. तसेच मेक इन इंडिया या संकल्पनेस पूरक सहाय्य्य करण्यासाठी उत्पादन क्षेत्राकरिता आवश्यक कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्माण करणे तसेच समाजातील मागास, दुर्लक्षित घटकांचा कौशल्य विकास करणे ही या प्रकल्पाची उद्दिष्टे असल्याची माहिती यावेळी प्रकल्पाच्या शिष्टमंडळाने यावेळी दिली. निमा सहकार्य करणार प्रकल्पास निमा सहकार्य करणार आहे. उद्योगांमध्ये तंत्रशिक्षणाच्या विविध शाखांनुसार आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळाची माहिती निमातर्फे उपलब्ध करून दिली जाणार आहे. यावेळी चर्चेत निमा अध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, मानद सचिव सुधाकर देशमुख व औद्योगिक धोरणे व विकास समितीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांचा सहभाग होता.

फोटो - http://v.duta.us/bno1CAAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/ohpb6QAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬