[nashik] - देवळाली गावामध्ये दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक

  |   Nashiknews

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देवळालीगावात बुधवारी सायंकाळी दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक केले. दंगल झाल्यास ती कमी वेळेत नियंत्रणात आणून शांतता कशी प्रस्थापित करता येईल, असा या आयोजनामागील उद्देश होता.

सहाय्यक पोलिस आयुक्त ईश्वर वसावे, उपनगर ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी, नाशिकरोडचे सूरज बिजली, कुंदन जाधव, निरीक्षक देवीदास वांजळे, खडके, चौधरी आदींच्या मार्गदर्शनाखाली गुजरात राज्य राखीव दलाचे जवान, नाशिकरोड, देवळालीगाव व उपनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी, पोलिस आयुक्त कार्यालयाचे दंगा नियंत्रण पथक, होमगार्ड आदी शंभरावर जवान सहभागी झाले. यावेळी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली. सायंकाळी साडेचारला सुरू झालेले प्रात्यक्षिक पाच वाजेच्या सुमारास संपले.

दंगल झाली तर कमी वेळेत कशी नियंत्रण करावी, शांतता कशी प्रस्थापित करावी याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यातील त्रुटी दूर करण्यात येतील. देवळालीगाव परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले....

फोटो - http://v.duta.us/FqB0YgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/luSjJAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬