[nashik] - 'भाजप सरकारच्या काळात भारताची जगात बेइज्जती'

  |   Nashiknews

निफाड : भारतापेक्षा नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानातही मुलांना अधिक अन्न मिळतं, ही बातमी भारतासारख्या अन्नधान्याची निर्यात करणाऱ्या देशासाठी चांगली आहे का?, असा सवाल करत सध्याच्या भाजप सरकारच्या काळात जागतिक पातळीवर देशाची सर्वाधिक बेइज्जती झाली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली.

शरद पवार यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू असून निफाड मतदारसंघातील उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारासाठी पवार यांची पिंपळगाव येथे सभा झाली. या सभेत बोलताना पवारांनी राज्य, केंद्र सरकार व भाजपवर जोरदार हल्ला चढवला. देशाचे पंतप्रधान वा त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य मंत्री भारतात आणि भारताबाहेरही दौरे करत असतात. अर्थात ते परदेशात जाऊन जे बोलतात ती देशाची भूमिका असते, असे नमूद करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेत जाऊन केलेल्या विधानावर पवारांनी आक्षेप नोंदवला. भारताची अर्थव्यवस्था माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि रिझर्व्ह बँकेच्या तत्कालीन गव्हर्नरांमुळे डबघाईला आली आहे, असं विधान सीतारामन यांनी अमेरिकेत जाऊन करणे योग्य नाही, असे सांगतानाच परदेशात जाऊन देशातील महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल टीकाटिपण्णी करायची नाही, इतकीही जाण तुम्हाला नाही का?, असा सवाल पवारांनी केला. पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेचा मान त्यांनी व आम्हीही ठेवला पाहिजे, असेही पवार पुढे म्हणाले....

फोटो - http://v.duta.us/HLUb7QAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/8HA_MwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬