[nashik] - मांडूळ तस्करीत दोन जणांना कोठडी

  |   Nashiknews

म. टा. प्रतिनिधी, नाशिक दुर्मिळ प्रजातीच्या मांडुळाची तस्करी करणाऱ्या दोघांना नाशिक पश्चिम वनविभागाने सापळा रचत अटक केली असून संशयितांना बुधवारी (दि. १६) न्यायालयात हजर केले असता दोन दिवसीय पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, संशयितांच्या दोन फरार साथीदारांची ओळख पटली असून त्यांच्या मागावर पथक रवाना केले आहे. नाशिक पश्चिम वनपरिमंडळ अधिकारी यांना मिळालेल्या माहितीनुसार, पेठरोड परिसरातील यशोदानगर येथील शामा प्रसाद मुखर्जी उद्यानात मंगळवारी (दि.१५) सायंकाळी सहा वाजता साध्या वेशात सापळा रचण्यात आला. तेव्हा एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकीतून (एमएच ०४ जीडी ५८४६) संशयित पिराजी ज्ञानबा किर्ते व वैज्यनाथ बालाजी सोनटक्के (दोघे वय ३०, रा. परळी, बीड) घटनास्थळी आले. त्यांनी गाडीच्या डिक्कीतून बादली काढून तेथील एका बांधकाम प्रकल्पाच्या रखवालदाराकडे दिली. रखवालदाराने बादली घरात नेल्यानंतर इतर दोघांच्या सहाय्याने मांडुळ जातीच्या सापाचे वजन केले. चित्रीकरण व छायाचित्रे काढून खरेदीदाराला पाठविण्यात आले. दोघे संशयित गाडीत पुन्हा बसत असताना पथकाने अटक केली. दरम्यान, इतर दोघे मांडुळाची बादली रखवालदाराच्या घरात सोडून फरार झाले. वनपाल मधुकर गोसावी यांनी उपवनसंरक्षक शिवाजी फुले, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांना तस्करांची माहिती दिली. त्यानुसार वनपाल गोसावी, अनिल अहिरराव, वनरक्षक उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे, गोविंद पंढरे, रोहिणी पाटील, विजयसिंग पाटील यांनी सापळा रचला. न्यायालयाने दोघांनी कोठडी सुनावली असून इतर दोघांच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. जादुटोणा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या सापाचे रॅकेट पकडण्यासाठी पथक तैनात केले आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/7zZwSQAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬