[nashik] - स्थानिक प्रश्नांवरच व्हावी निवडणूक

  |   Nashiknews

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येत्या २१ ऑक्टोबरला होऊ घातलेली विधानसभा निवडणूक ही सत्ताधारी अन् विरोधकांकडून राष्ट्रीय मुद्द्यांभोवती फिरवली जात आहे. विधानसभेत विकासाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक मुद्द्यांनाच महत्त्व हवे. इतर मुद्द्यांचा समावेश करून निवडणुकीत सहभागी सर्वच राजकीय पक्षांनी आपले लक्ष विकासाच्या पायाभूत संकल्पनांवर केंद्रीत करावे, असा सूर 'मटा कट्टा'च्या व्यासपीठावर व्यक्त झाला.

छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या समन्वयातून या व्यासपीठावर केटीएचएम, मविप्रचे महर्षी शिंदे बी. एड. कॉलेज, समाजकार्य महाविद्यालय आणि लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मते मांडली.

रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधांसह अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, अराजकता, बेरोजगारी, महिला सुरक्षितता, शिक्षणाचे बाजारीकरण, शेतकरी आत्महत्या, कृषी क्षेत्राची पीछेहाट, कामगार-कष्टकरी वर्गावर होणारा अन्याय आदी विषयांची कोंडी चर्चेत सहभागी विद्यार्थ्यांनी फोडली. राजकीय पक्ष कोणताही असो, अगोदर विकासाच्या स्थानिक प्रश्नांचे प्रगतीपुस्तक आणि व्हीजन मांडा, नंतर इतर मुद्द्यांना स्पर्श करा असेही मत चर्चेत सहभागी विद्यार्थ्यांनी मांडले....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/qLrSoAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬