[navi-mumbai] - आठ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्याला २० वर्षे सक्तमजुरी

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

आठ वर्षीय अल्पवयीन मेव्हणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बलात्कार आणि पोक्सो कलमाखाली अटकेत असलेल्या आरोपीला बुधवारी अलिबाग येथील सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ऑक्टोबर २०१८ मध्ये उरणच्या करळ भागात ही घटना घडली होती.

पीडित अल्पवयीन मुलगी ही उरणच्या करळ भागात रहाण्यास असून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी तिचा मेव्हणा आहे. पीडित मुलीच्या अजाणतेपणाचा फायदा उचलत आरोपीने ऑक्टोबर २०१८मध्ये पीडित मुलीवर स्वत:च्या घरामध्ये लैंगिक अत्याचार केले होते. त्यावेळी न्हावा-शेवा पोलिसांनी आरोपीवर बलात्कारासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. त्यानंतर न्हावाशेवा पोलिसांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून सत्र न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी अलिबाग येथील विशेष सत्र न्यायालयात सुरू असताना या खटल्यामध्ये एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यात पंच डी. डी. पाटील, एस. एस. गायकवाड, रासायनिक विश्लेषक व वैद्यकीय अधिकारी डॉ. ठमके त्याचप्रमाणे महिला पोलिस उपनिरीक्षक चिवटे या साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. मात्र या खटल्यातील पीडित मुलगी फितूर झाल्याने व आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला नसल्याचे तिने सांगितले होते. सरकारी वकिलांनी पीडित मुलीच्या घेतलेल्या उलट तपासणीत पीडित मुलीने घटना घडल्याचे मान्य केले. त्यानंतर सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद तसेच दाखल केलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे ग्राह्य धरून बुधवारी अलिबाग सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेशसुद्धा न्यायालयाने यावेळी दिले.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/udT_uwAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬