[navi-mumbai] - आयुक्तांचा दणका

  |   Navi-Mumbainews

परिवहन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका

कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनही देणार

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

परिवहन उपक्रमाच्या अभियांत्रिकी व वाहतूक विभागाच्या कामकाजात हव्या त्या प्रमाणात सुधारणा झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून देत बेजबाबदार व कामचुकार अधिकारी, कर्मचारी यांच्याविरोधात तात्काळ कारवाई करण्याचे अन्यथा संबधित विभाग प्रमुखांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश परिवहन प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार दोन कर्मचाऱ्यांवर सेवेतून निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

वाहतूक विभागात मार्ग तपासणीसाठी कार्यरत सहाय्यक वाहतूक निरीक्षक लक्ष्मण तबाजी सानप यांनी वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशानुसार बस अपघात प्रकरणाची सुयोग्य हाताळणी न केल्याने निलंबित केले आहे. तसेच, सहाय्यक वाहतूक निरीक्षक देविदास कान्हा वारघडे यांनी वाहकाच्या कॅश बॅग तपासणीचा अहवाल जाणीवपूर्वक उशिरा सादर केल्याचे निदर्शनास आल्याने तसेच नेमून दिलेल्या कामगिरीच्या ठिकाणी विहित वेळेत उपस्थित न राहिल्याने व रात्रपाळीच्या मार्ग तपासणीत वेळकाढूपणा केल्याने १४ ऑक्टोबरपासून परिवहन उपक्रमाच्या सेवेतून निलंबित करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे....

फोटो - http://v.duta.us/lQDVqQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/CifvrQAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬