[navi-mumbai] - भाजपचे शक्तिप्रदर्शन

  |   Navi-Mumbainews

ऐरोली मतदारसंघात गणेश नाईक यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा रोड शो

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

ऐरोली विधानसभा मतदारक्षेत्रातील महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नवी मुंबईत मेगा रोड-शो केला. वाजत-गाजत निघालेल्या या रोड-शोमध्ये शेकडो बाइकस्वार आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. ठिकठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस आणि गणेश नाईक यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी नाईक यांच्या विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

वाशी, सेक्टर-१४ येथील एम. जी. कॉम्प्लेक्स येथून या रोड-शोला सुरुवात झाली. यानंतर वाशी, जुहूगाव, कोपरखैरणे, घणसोली, नोसिल नाका, रबाले, ऐरोली, दिघामार्गे दिघा येथील पटणी रोड येथे या रोड शोची सांगता झाली. या रोड शोमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, आमदार नरेंद्र पाटील, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेवक अंनत सुतार, माजी महापौर सागर नाईक, आरपीआयचे सिद्राम ओहोळ, प्रा. वर्षा भोसले यांच्यासह महायुतीचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते....

फोटो - http://v.duta.us/fsRb_wAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/R-WU9AAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬