[pune] - अफ‌वा पसरविणाऱ्यांविरोधात महाबँकेची तक्रार

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

व्हॉट् सअॅप, वेबसाइट्स आणि इतर समाज माध्यमांतून बँक ऑफ महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबाबत चुकीची माहिती आणि अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध बँकेने पोलिसांकडे धाव घेतली आहे. बँकेने पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे. अफवा पसरवणाऱ्यांविरोधातले सर्व तपशील पोलिसांना देण्यात आले आहेत. या चुकीच्या महितीच्या मूळ स्त्रोताचा शोध घ्यावा आणि या कृत्यासाठी जबाबदार व्यक्तींच्या विरोधात कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी विनंती बँकेने पोलिसांना केली आहे. संचित तोटा आणि लेखा (अकाउंट्स) आपल्या राखीव ठेवींमधून समायोजित करण्यासाठी बँकेने रिझर्व्ह बँकेकडे संपर्क साधला आहे. असे बँकेने केले नाही तरीदेखील बँकेची आर्थिक स्थिती स्थिर, अखंडित आणि मजबूतच राहील. त्यामुळे ठेवीदारांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/hARkfwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬