[pune] - कॉंटे की टक्कर

  |   Punenews

सूर्यकांत आसबे, सोलापूर

मुस्लिम, मोची, पद्मशाली आणि मागासवर्गीय समाजाचे वर्चस्व असलेल्या सोलापुरातील शहर मध्य विधानसभा मतदारसंघात यंदा 'काँटे की टक्कर' पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे या मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर झालेले पक्षांतर, उमेदवारी न मिळाल्याने झालेल्या बंडखोरीमुळे येथे पंचरंगी लढत होत असून, प्रणिती यांच्यासाठी ही निवडणूक तितकी सोपी राहिली नाही.

या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून प्रणिती शिंदे, शिवसेना-भाजप महायुतीकडून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम, 'एमआयएम'चे फारूक शाब्दी हे पक्षाचे प्रमुख उमेदवार आहेत. तर, शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले महेश कोठे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्याशिवाय, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, इतर पक्ष व अपक्ष असे एकूण २० उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत या पाच उमेदवारांमध्येच होत आहे. या पंचरंगी लढतीत मतदारसंघातील एकूण ३ लाख १ हजार ६४ मतदार कोणाचे पारडे जड करतील, हे पाहणे औत्स्युक्याचे आहे....

फोटो - http://v.duta.us/GH6yqgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/cI20EwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬