[pune] - जिल्ह्यात उभारणार एकवीस सखी केंद्रे

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मतदान प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक याप्रमाणे महिला (सखी) मतदान केंद्र असणार आहेत. जिल्हा निवडणूक शाखेने ही केंद्रे निश्चित केली असून, मतदानाच्या दिवशी या केंद्रांचा कारभार महिलांकडून पाहिला जाणार आहे.

शहरातील आठ, पिंपरी चिंचवडमधील तीन आणि ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदारसंघनिहाय २१ महिला मतदान केंद्रे असणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही केंद्रे निवडण्यात आली आहेत. ही केंद्रे संवेदनशील ठिकाणांपासून दूर अंतरावरील आहेत. तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्यांपासून जवळ असलेली मतदान केंद्रे महिला मतदान केंद्रांसाठी निवडण्यात आली आहेत. मतदानाच्या दिवशी या केंद्रांचे कामकाज महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून पाहिले जाणार आहे. या केंद्रांच्या ठिकाणी रांगोळ्या काढल्या जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले....

फोटो - http://v.duta.us/y1q_owAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/7VCI1wAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬