[pune] - दिवाळीपूर्वी वेतन करा

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी म्हणजे २५ ऑक्टोबरपूर्वी केले जाणार आहे, अशी माहिती राज्य सरकारने निर्णयाद्वारे मंगळवारी दिली आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन अद्याप झाले नसल्याने, त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन महिन्यांचे एकत्रित वेतन दिवाळीपूर्वी मिळणार का, याबाबत अजून अस्पष्टता आहे.

या निर्णयाचा राज्य सरकारी कर्मचारी; तसेच जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्तीधारक यांना लाभ होणार आहे. या संदर्भात सरकारचे उपसचिव इंद्रजित गोरे यांनी ९ ऑक्टोबर रोजी आदेश दिले होते. त्यावर दोनच दिवसांनी, ११ ऑक्टोबर रोजी राज्याच्या लेखा व कोषागार विभागाचे संचालक ज. र. मेनन यांनी निवडणुकीच्या कामासाठी कोषागारातील अधिकारी, कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्यात आल्याने हे शक्य होणार नाही, असे म्हटले होते. त्यामुळे दोन्ही वेतन एकत्रच देण्याचा निर्णय स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले होते; मात्र, मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा सरकारने परिपत्रक काढले. त्यात वेतन २५ ऑक्टोबरपूर्वी करण्याचे आदेश गोरे यांनी दिले आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/B-8u9gAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬