[pune] - पासपोर्ट काढताय?सावध राहा

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पासपोर्टची 'ऑनलाइन अपॉइंटमेट' घेताय? तुम्ही ज्या वेबसाइटवर स्वत:ची माहिती देत आहात, ती सरकारी आहे का, याची खात्री करा, असे आ‌वाहन पुणे पासपोर्ट विभागाने केले आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पासपोर्ट वेबसाइटसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या काही वेबसाइट सुरू झाल्या आहेत. या वेबसाइटवरून नागरिकांच्या माहितीचा गैरवापर आणि पैशांची फसवणूक होते आहे. नागरिकांनी खबरबदारी घेण्याची सूचना परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

गेल्या काही महिन्यांत पासपोर्ट अर्ज भरताना फसवणूक झाल्याच्या तक्रारी देशभरातील विविध भागांतून मंत्रालयाकडे नोंदविण्यात आल्या आहेत. ऑनलाइन गैरव्यवहार करणाऱ्यांनी पासपोर्टचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मूळ वेबसाइटसारख्या दिसणाऱ्या वेबसाइट तयार केल्या आहेत. यात www.indiapassport.org, www.online-passportindia.com, www.passportindiaportal.in, www.passport-india.in, www.passport-seva.in, www.applypassport अशा वेगवेगळ्या पासपोर्ट साइट करण्यात आल्या आहेत. लोकांकडून मिळणाऱ्या माहितीचा गैरवापर आणि पैशांचीही फसवणूक होते आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहून केंद्र सरकारच्या www.passportindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अथवा एमपासपोर्ट सेवा या मोबाइल अॅप्लिकेशनवर पासपोर्टचा अर्ज भरावा, असे आवाहन प्रसिद्धपत्रकात करण्यात आले आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/lJOXngAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬