[pune] - बारा हजार विद्यार्थ्यांचे 'डिस्टन्स'साठी अर्ज

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरशिक्षण (डिस्टन्स) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी मुदत संपली असून, आतापर्यंत १२ हजार ७९० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. अद्याप शुल्क न भरलेल्या किंवा अर्ज अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० ऑक्‍टोबरपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती मुक्‍त अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली. 'विद्यापीठाने यंदा बहि:स्थ अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष प्रवेश बंद केले. त्याऐवजी प्रथमच दूरशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू केले आहेत. पहिल्या वर्षी जवळपास १३ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील सात हजार विद्यार्थ्यांनी दूरशिक्षणाचे प्रवेश 'कन्फर्म' केले आहेत. ऑनलाइन अर्ज केले असली तरी अभ्यासक्रमाचे शुल्क भरण्याशिवाय प्रवेश निश्‍चित होऊ शकत नाही. अशा सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेशाचे शुल्क भरले नाहीत. त्या विद्यार्थ्यांना अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० ऑक्‍टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पात्रतेचे निकष तपासण्यात येत आहे. त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे,' अशी माहिती डॉ. सोनवणे यांनी दिली.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/SAgu4wAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬