[pune] - 'मनी ट्रान्स्फर'पडले महागात

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अडचणीत असणाऱ्या मैत्रिणीला पाच हजार रुपये ऑनलाइन पाठविणे महिलेला महागात पडले आहे. त्यानंतर महिलेच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी ७० हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ५७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात मोबाइलधारकाविरोधात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मैत्रिणीला मुलीच्या हॉस्टेलला प्रवेश घेण्यासाठी पैसे भरायचे होते. त्या वेळी मैत्रिणीने तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये मागितले. त्या वेळी तक्रारदार यांनी 'गुगल पे'वरून मैत्रिणीचा मोबाइल क्रमांक 'लिंक' केला. तसेच, त्यावर पाच हजार रुपये ऑनलाइन पाठविले. त्यानंतर तक्रारदार यांना एक लिंक आली. त्यांनी त्या लिंकवर क्लिक केले असता चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून ७० हजार रुपये काढून घेतली. जुलै महिन्यात हा प्रकार घडला आहे. याबाबत त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्याची प्राथमिक चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब कोपनर तपास करत आहेत.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/7UbpSAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬