[pune] - युनिकॉर्न कंपन्यांचीयशोगाथा उलगडणार

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एक अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षाही अधिक बाजारमूल्य असलेल्या खासगी स्टार्टअप कंपनीला 'युनिकॉर्न कंपनी' म्हटले जाते. सध्या पुण्यात अशा तीन युनिकॉर्न कंपन्या आहेत. या कंपन्या स्थापन झाल्या कशा, त्यांची वाटचाल कशी झाली, त्या युनिकॉर्न कशा झाल्या हे आता पुणेकरांना जाणून घेता येणार आहे. यातील पहिल्या कंपनीची यशोगाथा आज, गुरुवारी उलगडणार आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर अर्थात, 'एमसीसीआयए'च्या वतीने आयोजित 'युनिकॉर्न ऑफ द पुणे सिरीज' या मालिकेतून ही यशोगाथा सर्वांसमोर येणार आहे. गुरुवारी या मालिकेच्या पहिल्या भागात एमसीसीआयएच्या आयटी समितीचे अध्यक्ष अमित परांजपे 'आयसर्टिस' या युनिकॉर्न कंपनीचे सहसंस्थापक मोनीष दर्डा यांच्याशी संवाद साधतील. सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी ट्रेड टॉवर्स येथील 'एमसीसीआयए'च्या कार्यालयात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/7UF0KAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬