[satara] - आपसात भांडणारे सत्ता कशी चालवणार? मोदींचा जोरदार हल्ला

  |   Sataranews

सातारा: काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी आहे. दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडणे सुरू आहेत, असं सांगतानाच जे पक्ष आपआपसात भांडण करतात ते सत्ता कशी चालवणार? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केला.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो, अशी मोदींनी मराठीत भाषणाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी केंद्र आणि राज्यसरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांची जंत्री सादर करतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला. साताऱ्याला अभेद्य किल्ला मानणारे लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्यास घाबरत होते. त्यामुळेच राष्ट्रवादीने पृथ्वीराज चव्हाण यांना निवडणूक लढविण्याची गळ घातली. पण साताऱ्यात काही खरं नसल्याचं लक्षात आल्याने चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचंच नाव पुढं केलं. मात्र पवार हे राजकारणातील मुरलेले खेळाडू आहेत. त्यांना हवेचा अंदाज सर्वात आधी येतो. त्यामुळे त्यांनीही काळाची पावलं ओळखत साताऱ्यातून लढण्यास नकार दिला. साताऱ्यातून लढण्यास दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी पळ काढला, असा टोला हाणतानाच उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजेंना रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून द्या, असं आवाहन मोदींनी केलं....

फोटो - http://v.duta.us/9lZFjwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/Y0n1DAEA

📲 Get Satara News on Whatsapp 💬