[satara] - कलम ३७० वरून उदयनराजे भडकले

  |   Sataranews

कलम ३७० वरून उदयनराजे भडकले

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'कलम ३७० या मुद्यावर निवडणूक होत आहे. ही निवडणूक काश्‍मिरची आहे की, महाराष्ट्राची,' असे विरोधक विचारत आहेत. असा प्रश्न एका पत्रकाराने उदयनराजेंना करताच ते भडकले. उदयनराजे म्हणाले, 'जे असे प्रश्‍न उपस्थित करतात, त्यांनी देशात राहू नये. स्वतःच्या प्राणाची बाजी लावून जवान देशाचे रक्षण करीत असतात. त्यांच्याबद्दल हे लोक महाराष्ट्राचा काय संबंध आहे, असे विचारतात. त्यांना लाज वाटायला पाहिजे.'

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखत प्रसंगी उदयनराजे बोलत होते. उदयनराजे म्हणाले, 'आपले जवान आहेत म्हणून देश सुरक्षित आहे. कधी तुम्ही त्यांच्या कुटुंबात डोकावून पाहिले आहे का? जी तरुण मुले शहीद होतात, ही मुले कोणाचे तरी वडील असतात, कोणाचे तरी पती असतात. त्यांच्या कुटुंबाची होणारी वाताहत मी पाहिली आहे. कलम ३७० रद्द झाल्याने देशात शांतता नांदत आहे. आमची मुले सुखरुप आहेत. गड-किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांनी विशिष्ट उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन बांधले आहेत. त्या किल्ल्यांचा जिर्णोद्धार, देखरेख झालीच पाहिजे. त्यासाठी निधीची आवश्‍यकता आहे. त्यासाठी गड-किल्ल्यांवर टुरिझम क्‍लस्टर झाले पाहिजे. रोप-वे झाले पाहिजेत. मग ज्येष्ठ नागरिकांना सोयीचे होईल. देश-परदेशातील लोक मोठ्या प्रमाणात येतील. पूर्वी जे गडावर रहायचे आणि आजही जे राहतात. ते तिथेच साध्या पद्धतीने मंदिरात लग्न करतात. किल्ले विकसीत करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. तेथे हॉटेल, बार सुरू करण्याचा सरकारचा प्रस्ताव असेल तर माझाच काय सगळ्यांचाच विरोध असला पाहिजे.'...

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/3tDSVAAA

📲 Get Satara News on Whatsapp 💬