[thane] - एक्स्प्रेसमध्ये दगड लागल्याने तरुणी जखमी

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, कल्याण

लोकल, एक्स्प्रेसवर दगड फेकून प्रवाशांना जखमी करण्याचे प्रकार सुरूच आहेत. बुधवारी सकाळी एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असताना बाहेरून फेकलेला दगड एक्स्प्रेसच्या दरवाजातून प्रवास करणाऱ्या कॉलेज तरुणीच्या पायाला लागला. यामुळे तिच्या पायाला गंभीर जखम झाली. या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सानिया अन्वर मणियार (१६) असे या तरुणीचे नाव असून ती पुणे येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहून सकाळी ११.३०च्या सुमारास हैद्रराबाद एक्स्प्रेसमधून कल्याण येथे कॉलजमध्ये जाण्यासाठी येत होती. यावेळी एक्स्प्रेसमध्ये गर्दी असल्याने दरवाजा शेजारी फुटबोर्डवर उभी असताना नेरळ व कर्जतदरम्यान अज्ञात व्यक्तीने भिरकावलेला दगड सानियाच्या पायाला लागून तिला खोलवर जखम झाली व रक्त येऊ लागले. याबाबत कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी रेल्वे प्रशासना ला कळवले असता सानियाला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/MCJMLgAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬