[thane] - गणपत गायकवाड यांना शिवसैनिकांचा विरोधच

  |   Thanenews

उमेदवारासोबतच्या बॅनरवरील सेना नगरसेवकांनी फोटो काढले

म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर

कल्याण पूर्व मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या उल्हासनगरमधील प्रचाराला शिवसैनिकांचा विरोध वाढत असून, उल्हासनगर येथील मध्यवर्ती शिवसेना शाखेवर गणपत गायकवाड यांच्या प्रचाराचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर गणपत गायकवाड यांच्यासोबत स्थानिक नगरसेवकांचीही छायाचित्रे लावण्यात आली होती. या बॅनरवरून शिवसेना नगरसेवकांनी आपली छायाचित्रे कापून नेल्याचा प्रकार बुधवारी संध्याकाळी समोर आला. दुसरीकडे बंडखोरी करणाऱ्या बोडारे यांना शिवसैनिकांचा पाठिंबा वाढत आहे.

कल्याण पूर्व भागात भाजपने गणपत गायकवाड यांना उमेदवारी दिली असतानाही, उल्हासनगर महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते धनंजय बोडारे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी शिवसैनिकांच्या पाठिंब्यातून शक्तिप्रदर्शन करत गायकवाड यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. उल्हासनरमधील १०, तर कल्याणमधील १८ नगरसेवकांनी बोडारे यांना समर्थन दिले....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/Z8ybCwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬