[thane] - ठाण्यात शैक्षणिक हब!

  |   Thanenews

संजय केळकर यांची जाहीरनाम्यात ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

शिवसेना आणि भाजपने राज्यपातळीवर जाहीरनामा प्रसिद्ध केला असला तरी ठाणे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी आपला स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला. ठाण्यात शैक्षणिक हब निर्माण करणे, बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठेसाठी गाळे उपलब्ध करून देणे, गृहसंकुलामध्ये पणनच्या माध्यमातून कॉप शॉपची साखळी करण्यास चालना देणे आदी आश्वासने या जाहीरनाम्यातून केळकर यांनी दिली आहेत.

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या हस्ते बुधवारी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी खासदार राजन विचारे उपस्थित होते. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पालिकेच्या मदतीने वाहनतळांची मदत करणे, पालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावणे, एसटी डेपोचा पुनर्विकास करून पार्किंग सुविधा निर्माण करणे, सरकार आणि पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आपला दवाखाना ही संकल्पना राबवणे, पर्यटकांना ठाणे दर्शनसाठी बससेवा उपलब्ध करणे, अधिकाधिक शेतकरी आठवडा बाजार सुरू करणे, ठाणेकरांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अल्पदरात सांस्कृतिक हॉल, तालमीसाठी जागा उपलब्ध करून देणे, शून्य कचरा मोहिमेसह इतरही वेगवेगळ्या कामासाठी पुढाकार घेण्याची हमी केळकर यांनी जाहीरनाम्यातून दिली आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/523qvgAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬