[thane] - पालघर: रात्रभर पबजी खेळायचा; गळफास घेऊन केली आत्महत्या

  |   Thanenews

पालघर: पबजीच्या वेडापायी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. डहाणूमधील एका आदिवासी विद्यार्थ्यानंही पबजी खेळण्यापासून रोखले म्हणून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हेमंत झाटे (वय १९) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. पबजी खेळण्यापासून रोखले म्हणून त्यानं गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं.

हेमंत हा डहाणूमध्ये राहत होता. तो बारावी उत्तीर्ण झाला होता. सध्या तो कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याचे वडील चिराग मेहता यांच्या भातगिरणीमध्ये काम करत होते. घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळं हेमंतचं शिक्षण थांबलं होतं. मात्र, मेहता यांनी हेमंतच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी घेतली होती.

मेहता यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंतला पबजी गेमचं व्यसन जडलं होतं. रात्री उशिरापर्यंत तो मोबाइलवर पबजी खेळत असे. मेहता यांनी हेमंतला अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर. पबजी खेळू नको असं सांगितलं. सोमवारी तब्येत बरी नाही असं सांगून हेमंत त्याच्या खोलीमध्ये लवकर झोपण्यासाठी गेला. मात्र, त्यानं खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्याजवळ कोणतीही चिठ्ठी सापडली नाही....

फोटो - http://v.duta.us/hzKDHgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/bMpSUwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬