[thane] - समर्थवाडी स्थानकाला लाल सिग्नल!

  |   Thanenews

बदलापूर-वांगणीदरम्यानच्या नव्या स्थानकाला तांत्रिक अडथळ्यांचे विघ्न

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

मध्य रेल्वेच्या कल्याण-कर्जत मार्गावरील सर्वाधिक अंतर असलेल्या बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान नव्या समर्थवाडी स्थानकाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून कासगाव भागातील हे स्थानक तांत्रिक अडथळ्यामुळे अडकून पडण्याची शक्यता आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक एस. पी. दुधे यांनी रेल्वे बोर्डाला पत्र लिहून हे ठिकाण तीव्र उतार आणि वळणाच्या ठिकाणी असल्याने भविष्यात याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे या स्थानकाला तांत्रिक अडथळ्यांचे विघ्न उभे आहे. परंतु रेल्वे प्रवासी संघटनांकडून या ठिकाणापासून एक किमीच्या अंतरावर चामटोली इथे नवे स्थानक तयार करण्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे. परंतु त्यासाठी आणखी काहीकाळ पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली असून समर्थवाडीचा पर्याय काहीसा धूसर झाला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/KDxQswAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬