पणजीचा कचरा साळगाव प्रकल्पात

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

पणजीचा कचरा साळगाव कचरा प्रकल्पात न स्वीकारण्यावरून साळगाव कचरा प्रकल्प व पणजी मनपा दरम्यान निर्माण झालेला वाद अखेर पाच दिवसांनी संपुष्टात आला आहे. मागील पाच दिवसांपासून पणजीत पडून असलेला कचरा शनिवारपासून साळगाव कचरा प्रकल्पात पाठवण्यास सुरुवात झाली. किनारी भागातून येणारे सांडपाण्याचे टँकर टोंक येथील मलनिस्सा:रण प्रकल्पात घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

साळगाव कचरा प्रकल्पात ओला कचरा पाठवण्यात यावा असे पत्र गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने पाठवल्यानंतर पणजी मनपाने साळगाव प्रकल्पाकडे कचर्‍याचा एक ट्रक शनिवारी रवाना करण्यात आला. साळगाव कचरा प्रकल्पात पणजीचा कचरा स्विकारण्यास सुरुवात झाल्याने टोंक पणजी येथील मलनिस्सा:रण प्रकल्पातदेखील किनारी भागातून आलेले सांडपाण्याचे टँकर सकाळपासून घेण्यात आल्याचे पणजी मनपाचे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-s-waste-at-the-Salgaon-project/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-s-waste-at-the-Salgaon-project/

📲 Get goanews on Whatsapp 💬