बहुजन विकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

  |   Maharashtranews

नालासोपारा : नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यात काल रात्री जोरदार राडा झाला. प्रदीप शर्मा यांच्या ताफ्यातील दोन वाहनांची नासधूस करण्यात आली. शर्मा पैसे गोळा करत असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. नालासोपारा पश्चिम निळेमोरे गावात रात्री ११ वाजता हा प्रकार घडला.

शर्मा यांच्या गाडीत मतदारांना आमीष दाखविण्यासाठी पैसे असल्याचा संशय आल्याने पोलिसांना गाडीची तपासणी करण्यास कार्यकर्ते सांगत असताना प्रदिप शर्मा यांच्या अंगरक्षकांनी बविआ कार्यकर्त्यांवर हात उगारला. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी शर्मा यांच्या दोन वाहनांच्या काचा फोडून आपला संताप व्यक्त केला.शर्मा यांच्या ड्रायव्हरनी त्याही परिस्थितीत गाडी भरधाव वेगाने वसईच्या दिशेने नेल्यामूळे त्यांच्या वाहनात खरोखरच पैसे होते का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे....

फोटो - http://v.duta.us/IyAl1AAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/aKzktwAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬