[ahmednagar] - नावंदेंच्या पुनर्नियुक्तीला पुन्हा स्थगिती

  |   Ahmednagarnews

जिल्हा क्रीडा अधिकारीपदाचा खेळ सुरूच; आता तिसऱ्या आदेशाची प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नगर

जिल्हा क्रीडा अधिकारी पदावरील नियुक्तीचा खेळ अद्याप सुरूच आहे. एकतर्फी पदमुक्त केलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्याकडे पुन्हा त्याच पदाची सूत्रे सोपविण्याचा आदेश शुक्रवारी मंत्रालयातून नगरला पोहोचला खरा. मात्र, त्यानंतर काही तासांतच या आदेशाला स्थगिती देण्यात आली. विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्याने हा आदेश काढला, त्याच अधिकाऱ्याने त्याला स्थगितीही दिली. नावंदेंची पुनर्नियुक्ती स्थगित झाल्याने आता तिसरा आदेश काय येतो, याची प्रतीक्षा आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव इ. मु. काझी यांनी पुण्याचे जिल्हा क्रीडाधिकारी विजय संतान यांच्याकडील नगर जिल्हा क्रीडाधिकारीपदाचा पदभार काढून तो पुन्हा नावंदे यांच्याकडे सोपविण्याचा आदेश शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) दिला. मात्र, काही वेळात त्यांनी आपल्याच आदेशाला स्थगिती देत असल्याचा दुसरा आदेश काढला. पुढील आदेश येईपर्यंत आधीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली, असल्याचे त्यांनी नव्या आदेशात म्हटल्याचे शनिवारी (१९ ऑक्टोबर) समोर आले. या प्रकरणावरून क्रीडा शिक्षक आणि विविध संघटनांमध्ये दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहेत....

फोटो - http://v.duta.us/BINU0QAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/3mQASAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬