[aurangabad-maharashtra] - पत्नीचा खून करून मृतदेह ड्रममध्ये कोंबला

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कौटुंबिक कलहातून पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केला आणि तिचे हात-पाय बांधून मृतदेह घराच्या आवारात असलेल्या ड्रममध्ये कोंबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. रत्ना पंडित बिरारे (रा. पानवडोद, ता. सिल्लोड, ह. मु. आसेफिया कॉलनी) असे मृत महिलेचे नाव असून, मारेकरी पंडित बिरारेला पोलिसांनी सिल्लोडमधून ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्ना बिरारे व तिचा पती पंडित बिरारे हे गेल्या १२ वर्षांपासून आसेफिया कॉलनी येथील रहिवासी शेख इर्शाद यांच्या घरी कामाला होते. पंडित बिरारे माळीकाम करीत होता. रत्ना ही घरातील कामे करून शेख इर्शादच्या म्हाताऱ्या आईची सेवा करायची. बिरारे दाम्पत्याला तीन मुली असून तिघींचेही विवाह झाले आहेत. दोघा पती - पत्नीमध्ये नेहमीच कौटुंबिक कारणावरून वाद होत होत. गुरुवारी सायंकाळी रत्ना टाउनहॉल परिसरात असलेल्या आपल्या माहेरी गेली होती. त्यावेळी पंडित देखील तिच्यासोबत होता. गेल्या दोन दिवसांपासून रत्ना कामाला आली नव्हती. शनिवारी सकाळपासून बंगल्याच्या आवारातून कुजलेला वास येत असल्याने शेख इर्शाद यांनी वास येत असलेल्या ठिकाणी जावून बघितले असता पाण्याच्या ड्रममध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेतीत रत्ना दिसली. इर्शाद यांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना आणि रत्नाच्या नातेवाईकांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव बेशुद्धावस्थेत रत्नाला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी रत्नाचा भाऊ विजय जोगदंड याने दिलेल्या तक्रारीवरून पंडित बिरारेविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय बहुरे करीत आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/MwwVYgAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬