[kolhapur] - 'रुस्तम-ए-हिंद' हरपला; कोल्हापुरात दादू चौगुलेंचे निधन

  |   Kolhapurnews

कोल्हापूर: देश-विदेशातील अनेक मल्लांशी भिडत त्यांना लाल माती आणि मॅटवर अस्मान दाखविणारे पैलवान 'रुस्तम-ए-हिंद' दादू चौगुले यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.

दादू चौगुले यांनी दोन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदकांची कमाई त्यांनी केली होती. या बरोबरच 'रुस्तुम ए हिंद', 'महान भारत केसरी' अशा पुरस्कारांनीही त्यांना सन्मानीत करण्यात आले. भारत सरकारने मानाच्या मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारानेही त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.

दादू चौगुले यांनी वयाच्या दहाव्या वर्षीच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा या छोट्याशा गावात कुस्ती खेळायला सुरुवात केली. या छोट्या कुस्तीपटूने वस्ताद गणपतराव आंदळकरांचे मन त्यात काळात जिंकले. आंदळकरांनी मोठे परिश्रम घेत दादूंना कुस्तीचे डावपेच शिकवले. त्यानंतर तयार झालेला हा कुस्तीपटू उत्तरेतील बुरुजबंद मल्लांशी भिडू लागला. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत दादूंनी अनेक मानाच्या गदा पटकावल्या. पैलवान आंदळकर, बाळ गायकवाड, बाळू बिरे यांच्या तालमीत घडलेल्या या पैलवानाने कोल्हापूरचा जरीपटका सर्वत्र मानाने फडकवत ठेवला....

फोटो - http://v.duta.us/MbEGWgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/s25ubAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬