Maharashtra Assembly Election 2019: उद्या मतदान; प्रशासकीय यंत्रणा सज्ज !

  |   Akolanews

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत धडाडणाऱ्या प्रचारतोफा शनिवार, १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता थंडावल्या. सोमवार, २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधानसभा निवडणूक प्रचाराची मुदत १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता संपली. त्यामुळे जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ धडाडणाºया प्रचारतोफा थंडावल्या. विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील १ हजार ७३० मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी मतदान पथके २० आॅक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर रवाना होणार असून, मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देत, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनामार्फत जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संवेदनशील मतदान केंद्रांच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त राहणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनी मोठया संख्येने मतदान करावे म्हणून मतदार जागृती अभियानाही सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यू. काळे उपस्थित होते....

फोटो - http://v.duta.us/iZzRTwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/RnGzfwAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬