[mumbai] - महिला डबा पुन्हा लक्ष्य!

  |   Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

लोकलमधील जीवघेण्या गर्दीमुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रोजच त्रास सहन करावा लागतो. एकीकडे प्रवासहाल सुरू असतानाच पुन्हा एकदा महिला डब्याला लक्ष्य करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धावत्या जलद लोकलवर दारूची काचेची बाटली फेकल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

कसारा स्थानकातून १ वाजून २२ मिनिटांनी निघालेली जलद लोकल कळवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरून सीएसएमटीकडे रवाना झाली. लोकल मुंब्रा खाडीजवळ पोहोचताच अज्ञाताने रिकामी बाटली लोकलच्या दिशेने भिरकावली. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही बाटली सीएसएमटी दिशेकडील प्रथम दर्जाच्या महिला डब्यावर आदळल्याने मोठा आवाज झाला. या बाटलीच्या काचा प्रथम दर्जाच्या पुरुष डब्यात देखील उडाल्या. दुपारची वेळ असल्याने महिला डब्यात प्रवाशांची संख्या कमी होती म्हणून कोणी जखमी झाले नाही, या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते....

फोटो - http://v.duta.us/25sMlQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/1keWwAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬