[navi-mumbai] - गाडीमधून बेकायदा मद्यसाठा जप्त

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

रबाळे एमआयडीसी पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान बेकायदा मद्य वाहून नेणारी बीएमडब्ल्यू गाडी पकडली असून या गाडीमधून पोलिसांनी हजारो रुपये किंमतीच्या बीअर आणि मॅकडोवेल्स व्हिस्कीच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. बीएमडब्ल्यू गाडीच्या पाठीमागील काचेवर नगरसेवक तर पुढच्या बाजूस नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत चिन्ह व अध्यक्ष एच प्रभाग समिती असा फलक आहे. या प्रकरणी पोलिसांनी गाडीचालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तसेच, मद्यसाठ्यासह बीएमडब्ल्यू गाडी जप्त केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांसह निवडणूक आयोगाकडून नेमण्यात आलेल्या भरारी पथकाकडून संशयास्पद वाहने व व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. रबाळे एमआयडीसी पोलिसांकडूनही शुक्रवारी दिघा येथील एमआयडीसी भागात विष्णूनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी करून संशयास्पद वाहनांची व व्यक्तींची तपासणी करण्यात येत होती....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/g_Yu5wAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬