[pune] - 'तरुणाईला परिवर्तन हवे'

  |   Punenews

म. टा. वृत्तसेवा, बारामती

'गेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप-सेनेच्या हाती राज्य सोपवले. आम्हीदेखील जनतेचा कौल स्वीकारला; पण पाच वर्षांत गृहिणी, शेतकरी, तरुण आणि उद्योजक यांच्या हितासाठी सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे तरुणाईच्या मनात सरकारविरोधी संताप असून, सत्ता परिवर्तन व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे,' असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.

महाआघाडीचे उमेदवार अजित पवार यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, रूपाली चाकणकर, अभिनेते अशोक समर्थ, विश्वास देवकाते, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड उपस्थित होते.

'हा बारामतीकर पुरून उरेल'

'भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांना तडीपार केले जाते. माझ्यावर कितीही खटले दाखल करा. त्या खटल्यांना हा बारामतीकर पुरून उरल्याशिवाय राहणार नाही. काय कराच ते करा,' अशा शब्दांत पवारांनी भाजपवर निशाणा साधला....

फोटो - http://v.duta.us/eobTBQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/VEoCXwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬