[pune] - पावसाच्या भीतीने उमेदवार 'गारठले'

  |   Punenews

मतदानावर परिणाम होण्याची भीती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकीकडे शनिवार-रविवारच्या वीकएंडसह सोमवारची जोडून आलेली सुट्टी...., मतदान याद्यांमधील घोळ आणि मतदान केंद्रांमध्ये ऐनवेळी केलेले बदल...आणि त्याबरोबरच सोमवारी मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता निर्माण झाल्यामुळे मतदानावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी घसरली, तर निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो या शक्यतेने अनेक उमेदवारांच्या पोटात गोळा आला आहे.

अनेक नागरिक मतदानाच्या सुट्टीचा फायदा घेऊन मतदानाला न येता सहलींना जात असल्याचे लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोगाने सुट्टीच्या दिवशी मतदान घेण्याची पद्धत बदलून आठवड्याच्या मध्यावर मतदान ठेवण्याची पद्धत सुरू केली आहे. मात्र, यंदा राज्यात सोमवारी मतदान होत आहे. आयटीयन्ससह सरकारी विभाग, बँका यांना शनिवार रविवारची सुट्टी मिळालेली आहे. त्यालाच जोडून मतदानाचीही सुट्टी मिळणार असल्याने नागरिक मतदान टाळून सहलींना जाण्याची शक्यता आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुणे, सातारा येथील सभांमध्ये 'जोडून सुट्टी आली, तरी मतदान करा,' असे आवाहन आवर्जून केले. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून हा टक्का वाढविण्याचे आवाहन राजकीय पक्षांच्या यंत्रणांपुढे उभे राहिले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/ERFNoQAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬