[pune] - पावसामुळे वाहतूक कोंडी

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात शनिवारी सकाळपासून कोसळणाऱ्या संततधारेमुळे शहरातील मध्यवस्ती, मुख्य रस्ते आणि उपनगरातील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. स्वारगेट-हडपसर रस्त्यावर ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक) ते रामटेकडी या दरम्यान सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दिवाळी एक आठवड्यावर येऊन ठेपली आहे. त्यापूर्वीचा शेवटचा वीकेंड असल्याने कपड्यांपासून विविध वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळपासून नागरिक घराबाहेर पडले होते. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी होती. मात्र, पावसामुळे वाहनांचा वेग मंदावल्याने आणि रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. शहराच्या मध्यवस्तीसह विधी महाविद्यालय रस्ता, भांडारकर रस्ता, कर्वे रस्ता, म्हात्रे पूल, प्रभात रस्ता, ना. गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), जंगली महाराज रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता येथे वाहतूक कोंडी झाली होती. नगर रस्ता, कोरेगाव पार्क या ठिकाणीदेखील वाहने पुढे सरकण्याचा वेग अतिशय मंद होता. तानाजी मालुसरे रस्त्यावरही (सिंहगड रस्ता) सायंकाळी सहा वाजल्यानंतर रात्री १० वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सोलापूर रस्त्यावर शंकरशेठ रस्त्यापासून रामटेकडीपर्यंत वाहने एकाच जागी थांबून राहिली होती. या कोंडीत अनेक पीएमपी बस अडकून पडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता. अनेक प्रवाशांनी बसमधून उतरून काही किलोमीटर अंतर पावसात चालत जाणे पसंत केले....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/4LRcMAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬