[thane] - दुरुस्तीनंतर पुन्हा टोल वसुली

  |   Thanenews

दिवाळीआधी भिवंडी-वाडा-मनोर रस्ता खड्डेमुक्त करण्याचे प्रशासनाचे नियोजन

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

भिवंडी-वाडा-मनोर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे डॉक्टर तरुणीचा झालेल्या मृत्यूनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतली असून दिवाळीआधी हा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा विडा पीडब्ल्यूडीने उचलला आहे. सध्या या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना टोलमधून मुक्ती मिळाली असली तरी खड्डे बुजवण्याचे काम संपल्यानंतर पुन्हा टोलवसुलीसाठी कंत्राटदार नेमून टोलवसुली करण्यात येणार असल्याची माहिती पीडब्ल्यूडीच्या ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

भिवंडी-वाडा मनोर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात होऊन हकनाक नागरिकांचे बळी जाऊ लागले आहेत. रस्त्याची अवस्था बिकट होऊनही संबंधित कंत्राटदार कंपनीने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले असून रस्त्याच्या पृष्ठभागाचे नूतनीकरणही न केल्याने अवघ्या सहा वर्षांतच हा रस्ता खड्ड्यात गेला. विशेष म्हणजे कंत्राटदार असलेल्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार नोटीस बजावल्यानंतर कंपनीने रस्ता व्यवस्थित केला नाही. परिणामी या महामार्गावर डॉ. नेहा शेख हिचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला. या अपघातानंतर जनक्षोभ उसळला आणि सरकारने सुप्रीम कंपनीचे कंत्राट रद्द करत टोलवसुलीला स्थगिती दिली. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महामार्गवरील खड्डे बुजवण्याचे काम करण्यात येत आहे. २४ ऑक्टोबर अर्थात दिवाळी अगोदर महामार्गावरील सर्व खड्डे बुजवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सध्या युद्धपातळीवर काम चालू आहे. परंतु खड्डे बुजवण्याचे काम झाल्यानंतर पुन्हा टोलवसुलीसाठी कंत्राटदार नेमण्यात येणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/D-oi9wAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬